|
FREE TICKET TO 2013 BMM Convention, click below for details. |
Convention News
|
Dec 2009 Reportशिकागोचे मेकॉर्मिक सेंटरमिशिगन सरोवराच्या काठावर असलेले शिकागोचे मेकॉर्मिक सेंटर ही कुणालाही अचंबा वाटावा अशी वास्तू आहे. इतक्या विशाल, सुंदर, अद्ययावत आणि अलिशान वास्तूमध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०११ सालचे अधिवेशन होणार आहे ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. नोव्हेंबर ७, २००९ रोजी ऑकक २०२० परिषदेमध्ये शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या विद्यमाने मेकॉर्मिक सेंटर जवळून बघता आले. सर्वप्रथम Arie Crown Theater मध्ये आम्ही गेलो. सुमारे ४२०० आसनक्षमतेचे हे सभागृह आहे. हे बघताना ज्या कोणी अभियंत्यांनी याची रचना केली असेल त्यांना प्रणाम करावासा वाटतो. रंगमंच सुमारे ९० फूट x ६० फूट आहे. रंगमंच, ध्वनी आणि आसन व्यवस्था अद्ययावत् आहे. मुख्य बैठक व्यवस्था एका मजल्यावर व त्यावर बाल्कनी असे उत्तुंग सभागृह आहे. सभागृहात कुठेही बसलात तरी सर्व व्यवस्थित बघता येईल व ऐकता येईल अशी मांडणी आहे. वरच्या रांगेत जायचे असेल तर elevator सुद्धा उपलब्ध आहे. मुख्य सभागृहाची फरशी ramp पध्दतीची असल्यामुळे मागे बसलेल्यांनाही रंगमंच छान दिसतो. Arie Crown Theaterच्या बाहेर पडलात की समोरच भोजन गृह आहे. येथे सुद्धा ४२०० लोक आरामात बसू शकतील व जेऊ शकतील एवढी प्रचंड जागा आहे. त्याला लागूनच २५०-३०० लोक बसू शकतील एवढ्या मोठ्या खोल्या आहेत. अधिवेशनातले काही कार्यक्रम इथे होऊ शकतील. मेकॉर्मिक सेंटरचे एक वैशिष्ट्य म्हणजे जागा भरपूर व प्रशस्त आहे. गावोगावची मंडळी बऱ्याच वर्षांनी भेटली की गप्पांना ऊत येतो. तेव्हा आरामात बसून गप्पा मारता येतील अशी व्यवस्था आधीच करून ठेवली आहे. खालच्या मजल्यावर भटारखाना आहे. हजारो लोकांचे खाणे पिणे तयार करण्यासाठी प्रचंड आकाराची भांडी, अवाढव्य stoves, refrigerators, ovens इत्यादी उपकरणे इथे सज्ज आहेत. वरच्या मजल्यावर Grand Ball Room आहे. २००० लोक बसून एखादा कार्यक्रम बघू शकतील एवढी विस्तीर्ण जागा आहे. मजा म्हणजे इथे बसल्यावर मिशिगन सरोवराचे विहंगम दृश्य दिसते. Grand Ball Roomला लागूनच आणखी मोठ्या खोल्या आहेत. तिथे सुद्धा निरनिराळे कार्यक्रम एका वेळी २५०- ३०० लोक बघू शकतील अशी रचना आहे. निळ्या जलाशयाच्या काठावर बांधलेले अतिशय भव्य आणि तितकेच रम्य मेकॉर्मिक सेंटर अधिवेशनाला आलेल्या प्रत्येकाला नक्कीच आवडेल. सुहास जोशी (Montville, NJ)
|