|
FREE TICKET TO 2013 BMM Convention, click below for details. |
Convention News
|
Aug 2009 Reportविलिस टॉवर वरून...नमस्कार मंडळी, फिलाडेल्फिया येथे झालेल्या अधिवेशनात २०११ सालचे अधिवेशन शिकागोला होणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर झाले आणि आम्ही शिकागोकरांनी उत्साहाने तेथील उपस्थितांना शिकागोला येण्याचं आमंत्रण देऊनच परतीच्या प्रवासाला निघालो. बरोबर सर्व मंडळींच्या काय हवं काय नको अशा सूचनांचं गाठोडं बांधून घेतलं. फिलाडेल्फियाला आलो होतो ते पाहुणे म्हणून आणि परतत होतो ते पुढच्या अधिवेशनाचे यजमान पद घेऊन. खरं तर फिलाडेल्फिया अधिवेशनाची धुंदी अजून उतरली नव्हती. ३-४ दिवस भरगच्च कार्यक्रम. नाटक, सिनेमा, संगीत, नृत्य, छोट्यांसाठी आणि मोठ्यांसाठी कार्यक्रम त्यातील काही भारतातील तर काही उत्तर अमेरिकेतील कलाकारांचे आणि जोडीला राजेशाही भोजनाचा बेत..खुसखुशीत, चमचमीत पदार्थांची चव जिभेवर रेंगाळत असतानाच जाणीव झाली की पुढचे अधिवेशन करायची जबाबदारी आता आपली शिकागोकरांची आहे. सर्वांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन अधिवेशनाची आखणी करायची म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. शिकागो मंडळाने बृ. मंडळाला अधिवेशन करण्याचा मानस कळवला तेव्हांच पूर्व तयारीला सुरूवात झाली होती. आता त्याला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले, परतल्यावर लगेचच अधिवेशनाच्या संयोजनासाठी बैठक झाली. नितीन जोशी, त्यांचे सहाय्यक सुजीत वैद्य आणि पंकज अकोलकर यांच्या नेतृत्त्वाखाली झालेली पहिलीच बैठक अत्यंत आखीव आणि सुसूत्र झाल्याने दीड तासातच सर्वांना माहिती मिळून सर्व समिती प्रमुखांची नियुक्तीही झाली. या सभेच्या यशात शिकागोच्या नेतृत्त्वाबरोबर सिऍटल अधिवेशनाचे संयोजक जयंत भोपटकर यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा होता. त्याचप्रमाणे फिलाडेल्फियाचे मुकुंद कुटे, मंदार जोगळेकर, योगेश दाते यांचेही सहकार्य मिळत आहे आणि मिळणार आहे. लवकरच ही मंडळी त्यांच्या सहकार्यांसह शिकागोच्या कार्यकारिणीतील निवडक समिती प्रमुखांना प्रत्यक्ष भेटून महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण करतील. समिती प्रमुखांनी त्यांच्या सहकार्यांची निवड करून ते कार्यरत झाले आहेत. मोहिनी जोशी (joshimohini@yahoo.com)
|