June, 2014

natural viagra alternative नमस्कार मंडळी,
मागील वृत्तात नमूद केले होते, की भारतीय मतदारांनी विचार करून मत दिले तर बरे होईल. मतदारांनी मनावर घेतले आणि त्याप्रमाणे एक सशक्त व व स्थिर सरकार दिले आहे. आणि असे सरकार चालवायला धडाडीचा नेताही मिळाला आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हा एक टर्निंग पॉइंट आहे असे वाटते. काळ काय ते ठरवीलच, पण शासनाच्या दृष्टीने आता चांगल्या दिवसांना सुरुवात झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
उत्तर अमेरिकेतील मराठी मंडळांमधील कुणी कार्यकर्ते आपल्या ऑफीसच्या वेळेत सुट्टी घेवून कौशल कट्टाच्या कलाकारांना एअरपोर्टवरून पिकप करत होते, तर कुणी त्यांचा चांगला पाहूणचार व्हावा, म्हणून सुट्टी घेत होते. कुणी मुलांचा सॉकरचा गेम चुकवून कार्यक्रमाच्या सभागृहाची मांडणी करत होते. एकंदरीत कितीही गैरसोय झाली तरी, सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हातभार लागल्यामुळे कौशल कट्टा कार्यक्रमाच्या ४० दिवसांच्या दौऱ्याची यशस्वी सांगता होत आहे, असे म्हणायला हरकत नाही.
यंदा प्रथमच, न्यू यॉर्क मधील भारतीय वकिलातीच्या (कॉन्सुलेट) कार्यालयीन परिसरात कॉन्सुल जनरल ज्ञानेश्वर मुळ्ये आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र-दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमांस न्यू यॉर्क, न्यू जर्सी, कनेटिकट व पेन्सिल्वेनिया राज्यांतून अनेकजण उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या संकल्पनेत पुढाकार असलेले न्यू जर्सीचे वसंत माधवी आणि मनीषा माधवी, "जय भारत ढोल ताशा पथक", आणि अनेक मराठी कलाकार व स्वयंसेवकांचा या कार्यक्रमाच्या योजनाबध्द आखणीत सहभाग होता.
मे महिन्यात, मला जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा, यांच्याशी सविस्तर चर्चा करायला मिळाली. त्यामुळे, अनेक वर्षांपासून चालू असलेल्या त्यांच्या कामाबद्दल तर माहिती मिळालीच, पण त्यांची संस्था अनेक वर्षांपासून समाजातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा कसा प्रयत्न करत आहे, तेही कळले. डॉक्टर शहा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एजिंगचे संचालक आहेत. त्यामुळे जगभरातील जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत आत्ताच काही ठोस पाऊले उचलली नाही, तर किती गंभीर परिणाम होऊ शकतात, हे त्यांनी आकडेवारी देऊन स्पष्ट केले. डॉक्टर शहांनी बृ. म. मंडळाच्या उत्तररंग प्रकल्पाबद्दलही उत्सुकतेने माहिती करून घेतली, व या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म. मं.) मराठी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, आयोजक ह्या सर्वांची मराठी शाळेच्या वार्षिक परीक्षेसाठी जोरात तयारी चालू आहे. त्या सर्वाना शुभेच्छा.
बृ. म. मंडळाच्या लॉस अँजलिस येथील आगामी अधिवेशनाच्या मार्केटिंग टीमचे काम जोरात चालू आहे. मी असे मानतो की, अधिवेशनाच्या निधी संकलनाचे, कार्यक्रमांसाठी प्रायोजक शोधण्याचे काम फक्त एका समितीचे नसून पूर्ण समुदायाचे आहे. त्यादृष्टीने, आपल्या माहितीची एकादी कंपनी अथवा संस्था चांगली प्रायोजक होण्यास इच्छुक असेल तर, आम्हाला जरूर कळवावे. अधिवेशनाचे कार्यकर्ते त्याचा जरूर पाठपुरावा करतील.
लवकरच बोलूयात.
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com