|
FREE TICKET TO 2013 BMM Convention, click below for details. |
Convention News
|
June 2010 Reportविलिस टॉवर वरून...नमस्कार मंडळी, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शिकागो येथील आगामी संमेलनाची तयारी जोरदार चालू झाली आहे. बृ. म. मंडळाच्या कार्यकारणीच्या संमतीने अधिवेशनाच्या उद्घाटन सोहोळ्याची (ओपनिंग सेरेमनीची) जबाबदारी शिकागो मंडळाने उचलली आहे. हा मनोरंजनात्मक कार्यक्रम शिकागोपुरता मर्यादित न ठेवता सर्व उत्तर अमेरिकेतील मंडळांना सामावून घ्यायचा आमचा मानस आहे. मिड्-वेस्ट मधील मराठी मंडळांकडून तर आम्हाला थेट सहभाग हवा आहे! मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ताकदीच्या अभिनेत्री अनुपमा धारकर ह्या शिकागोच्या जुन्या रहिवासी. अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. नृत्य-नाटिकेच्या निर्मितीचा दांडगा अनुभव असलेल्या अनुपमा धारकर यांच्या तालमीत सादर होणारा हा समारंभ आगळा-वेगळा, दर्जेदार, आणि देखणा होणार यात शंकाच नाही. उत्तर अमेरिकेतील गायक, वादक, नृत्यदिग्दर्शक, नर्तक, लेखक, कवी सर्वासर्वांना विनंती की तुम्हाला या सोहळ्यात सहभागी व्ह्यायचं असल्यास अनुपमा धारकर, ईमेल - anupama.dharkar@bmm2011chicago.com वर संपर्क करावा. कार्यक्रमाचा वरचा दर्जा राखण्यासाठी, सहभागी होउ इच्छिणा-या सर्वांसाठी काही किमान नियमही केले आहेत. अधिक माहिती http://bmm2011chicago.org/ ह्या संकेतस्थळावर दिल्या जाईल. तुमच्या मंडळाच्या स्थापनेचा इतिहास (कधी, कुठे, कुणी इ.) आणि त्याच्याशी निगडीत असणारी छायचित्रं आम्हाला हवी आहेत. ही सर्व माहिती कृपया कल्पना निमकर यांच्याकडे kalpana.nimkar@bmm2011chicago.com ह्या ईमेलवर पाठवावी. बृहन्महाराष्ट्र मंडळाशी संलग्नित प्रत्येक मंडळ अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिसणार बरं का! मग भाग घेणार ना या सोहोळ्यात?
माहिती आणि प्रसारण समिती बृ. म. मंडळ अधिवेशन (२०११), शिकागो
|