|
FREE TICKET TO 2013 BMM Convention, click below for details. |
Convention News
|
May 2010 Reportविलिस टॉवर वरून...नमस्कार मंडळी! महाराष्ट्र दिनाच्या आपण सर्वाना (belated) शुभेच्छा. याच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आम्ही शिकागोची पासष्ट स्वयंसेवक मंडळी अधिवेशन संयोजकांसह अधिवेशन स्थळी- मेकोर्मिक प्लेसचा दौरा करून आलो. सव्वाचार हजार लोकांची सोय असलेले अत्यंत भव्यदिव्य एरी क्राउन नाट्यगृह, सभागृहाच्या समोरच मुलांसाठी मोठी खेळण्यासाठी जागा, स्वच्छतागृहे आहेत. सभागृहाच्या दोन्ही बाजूस कॉन्फरन्स रूम्स आहेत. वरच्या मजल्यावर तीन लहान नाट्यगृहे तीन कॉन्फरन्स रूम्स, उंच छताची बॉल रूम (४५,०००चौरस फुट), सुमारे ३००,००० चौरस फूट जागा जेवणासाठी आणि विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे. याच मजल्यावर बॉल रूमच्या काचेच्या दारातून बाहेर गेल्यावर मिशिगन सरोवराचे नयनरम्य दर्शन घडते. हे संमेलन संस्मरणीय ठरावे व आपल्याला ह्या संमेलनाचा अधिक आस्वाद घेता यावा म्हणून आपल्या चिमुकल्यापासून Teen नुकल्यापर्यंत सर्वांची काळजी घ्यायला आणि त्यांच्या मनोरंजनासाठी रंगारंग कार्यक्रमांची आखणी करण्यास Kids Programming committee कार्यरत आहे. Fashion shows ते महाराष्ट्र Idol, नाटक ते नृत्य, बुद्धिबळ ते क्यारम, चमचागोटी ते क्रिकेट, ब्यांड ते जादुगार, कार्टून ते PG13, निबंध स्पर्धा, talk with Roll model अशा भरगच्च गम्मत गोष्टींची सोय करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. अधिवेशन समितीने एका raffle ची घोषणा केली आहे. ३१ मे २०१० पर्यंत आपण $1000 देणगी पाठवावी. Raffle साठी $ $250, $150, $100 बक्षिसे आहेत. अधिक माहिती: http://bmm2011chicago.org/
- पद्मिनी दिवेकर (शिकागो)
|