|
FREE TICKET TO 2013 BMM Convention, click below for details. |
Convention News
|
Apr 2010 Report
विलिस टॉवर वरून...नमस्कार मंडळी, जरी विश्वात्म होऊ, अंतरी मराठी राहू या शिकागो अधिवेशनाच्या बोधवाक्याला अतिशय समर्पक असे बोधचिन्ह आम्हाला मिळाले आहे. ४२ प्रवेशिकांमधून निवडलेली ही कलाकृती सादर केली आहे मिसिसागा, कॅनडा येथील सौ. प्रणिता देशपांडे यांनी! हे बोधचिन्ह www.bmm2011chicago.org ह्या वेबसाईटवर आता दिमाखात झळकते आहे. कृपया वेब साईटला जरूर भेट द्या. अधिवेशनातली दोन महत्वाची खाती म्हणजे कार्यक्रम आणि भोजन. नुकत्याच झालेल्या भोजन समितीच्या सभेत खमंग चर्चेनंतर रुचकर पदार्थांची यादी झाली त्याचबरोबर संभाव्य कंत्राटदारांची माहिती मिळविण्याचे काम उत्साहाने सुरु झाले आहे. उत्तर अमेरिका आणि भारतातील कलाकारांना अधिवेशनात कला सादर करण्यासाठी अधिवेशनाच्या संकेतस्थळावर सुमारे १ मे, २०१० पासून सविस्तर माहितीसह प्रवेशिका उपलब्ध होईल. शिकागोचे अधिवेशन हे आपल्या सर्वांसाठी सहकुटुंब सहलीचे कारण ठरावे यासाठी आमची पर्यटन समिती प्रयत्नशील आहे. १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी आमचे सुमारे २०० उत्साही स्वयंसेवक अधिवेशन स्थळाला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. तिथल्या सर्व सोयींची (आणि गैरसोयींची सुद्धा) पाहणी करून अधिवेशन सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी योजना आखण्यात येतील. - माहिती आणि प्रसारण समिती
|