|
FREE TICKET TO 2013 BMM Convention, click below for details. |
Convention News
|
Mar 2010 Report
विलिस टॉवर वरून...बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी सार्वजनिक निधी संकलनाचा शुभारंभ एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने शिकागोत झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या गाजत असलेल्या "थ्री इडीयट्स" मधला आर. माधवन् Habitat for Humanity संस्थेच्या मदतीसाठी अमेरिकेत दौरा करणार असं ठरलं आणि माधवन्च्या कार्यक्रमाच्या संयोजिका कल्पना निमकर (अधिवेशनाच्या भारतीय कार्यक्रम समितीच्या प्रमुख) ह्यांनी हा कार्यक्रम शिकागोमध्ये करूया का? अशी विचारणा केली. हाती आलेली चांगली संधी न दवडता आमच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेतली आणि ह्या निमित्ताने अधिवेशनाची बातमी शिकागोच्या सर्व वृत्तपत्रात झळकली! आर. माधवन्ची मनमोकळी मुलाखत हा एक आनंददायी अनुभव होता. ह्या मध्यमवर्गीय कर्मठ वातावरणात वाढलेल्या तरुणाच्या जीवनप्रवासाची चित्तरकथा खरोखर सिनेमात शोभून दिसेल अशीच होती. कार्यक्रम खूपच रंगला. अधिवेशनाच्या कार्यांनी आता चांगलाच जोर धरला आहे. २७ फेब्रुवारीस झालेल्या अधिवेशनाच्या सर्व कार्यकारी समिती प्रमुखांच्या सभेत आपल्या समितीच्या आजवरच्या कार्याची आणि पुढील उपक्रमांची माहिती सर्वांनी दिली. शिकागोचे अधिवेशन ४ जुलैच्या सुमारास न ठेवता जुलै २१ ते २४ रोजी का ठेवण्यात आले-असे काही लोकांनी विचारले. ४ जुलैच्या सुमारास असलेली प्रवाश्यांची गर्दी, हॉटेलचे वाढीव दर ही कारणे असली तरी सर्वात महत्वाचे कारण-अधिवेशनासाठी निवडलेल्या ४०००हून अधिक आसनक्षमता असलेल्या सुस< नाट्यगृहाची उपलब्धता. ह्या भव्य रंगमंचावर सादर होणारे कार्यक्रम पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल अशी संयोजकांना खात्री आहे. अधिवेशनासाठी ठेवलेल्या बोधचिन्ह स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विजेत्या चिन्हाची निवड होताच अधिवेशनाचे बोधचिन्ह दिमाखात अधिवेशनाच्या संकेतस्थळावर (www.bmm2011chicago.org) झळकेलच. - माहिती आणि प्रसारण समिती
|